शेतकरी बंधूंनो ,आजच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीमध्ये एकट्या शेतकऱ्याने शेती करणे अनेक वेळा अडचणीचे ठरत आहे. उत्पादन खर्च वाढत आहे, बाजारपेठेतील स्पर्धा वाढत आहे आणि शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरजही वाढत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे ही आज काळाची गरज बनली आहे.
हीच शेतकऱ्यांची गरज ओळखून शासनाने शेतकरी गट (Farmer Group) ही संकल्पना सुरू केली आहे.
शेतकरी गट म्हणजे काही ठराविक शेतकरी एकत्र येऊन शेती, उत्पादन, प्रक्रिया, विक्री किंवा शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी तयार केलेला गट.
अशा गटांना शासनाकडून विविध योजना, अनुदान, प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होते.
आपण आजच्या लेखामध्ये शेतकरी गट म्हणजे काय, गट स्थापन कसा करावा, नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी गट म्हणजे काय?
![]() |
| शेतकरी गट (Farmer group)नोंदणी प्रक्रिया 2026 – आवश्यक कागदपत्रे व शासकीय योजना. |
शेतकरी गट म्हणजे किमान 10 ते 20 शेतकरी एकत्र येऊन स्थापन केलेला संघटित गट. या गटाचा उद्देश शेतीचे उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला चांगला बाजार भाव मिळवणे हा असतो.
शेतकरी गटामध्ये सर्व सदस्य एकत्रितपणे निर्णय घेतात आणि शेतीसंबंधित कामे नियोजनबद्ध पद्धतीने करतात.
एकत्रित शेती
सामूहिक खते आणि बियाणे खरेदी
उत्पादनाची एकत्रित विक्री
शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे
यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा आणि बाजारात ताकद मिळते.
शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट
शेतकरी गट स्थापन करण्यामागे शासनाचे अनेक उद्दिष्टे आहेत.
मुख्य उद्दिष्ट
लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना एकत्र आणणे
शेती खर्च कमी करणे
उत्पादन वाढवणे
बाजारपेठेत चांगला दर मिळवून देणे
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे
शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे
यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यास मदत होते.
शेतकरी गटाचे फायदे.
शेतकरी गट स्थापन केल्याने अनेक फायदे मिळतात.
1. शेती खर्च कमी होतो
शेतकरी गटातील सदस्य एकत्रितपणे बियाणे, खते, औषधे खरेदी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे खर्च कमी होतो.
2. उत्पादन वाढते
गटामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादन वाढते.
3. बाजारपेठेत चांगला दर मिळतो
एकत्रित उत्पादन विक्री केल्यामुळे व्यापाऱ्यांकडून चांगला दर मिळतो.
4. सरकारी योजना मिळतात
शेतकरी गटांना विविध योजना आणि अनुदान मिळते.
5. शेतीपूरक व्यवसाय
शेतकऱ्यांना या गटाच्या माध्यमातून खालील व्यवसाय करता येऊ शकतात.
दुग्ध व्यवसाय
शेळीपालन
मत्स्यपालन
भाजीपाला उत्पादन
प्रक्रिया उद्योग
शेतकरी गट स्थापन करण्यासाठी आवश्यक अटी
गटामध्ये किमान 10 ते 20 शेतकरी असणे आवश्यक
सर्व सदस्य शेतकरी असणे आवश्यक
गटाचा अध्यक्ष आणि सचिव निवडणे
गटाचा ठराव तयार करणे
गटासाठी स्वतंत्र बँक खाते असणे
शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया 2026
शेतकरी गट नोंदणी करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
1. शेतकरी एकत्र येणे
सर्वप्रथम गावातील 10 ते 20 शेतकरी एकत्र येऊन गट तयार करतात.
2. गटाचे नाव निश्चित करणे
गटाचे एक वेगळे नाव ठेवले जाते. उदाहरण:
कृषी विकास शेतकरी गट
जय भवानी शेतकरी गट , अशाप्रकारे सर्वांच्या संमतीने आपण नाव ठेवू शकता.
3. अध्यक्ष व सचिव निवडणे
गटामध्ये अध्यक्ष, सचिव आणि सदस्य निवडले जातात.
4. गटाचा ठराव तयार करणे
गट स्थापन करण्यासाठी अधिकृत ठराव तयार केला जातो.
5. अर्ज सादर करणे
गटाची नोंदणी खालील कार्यालयात करता येते:
कृषी विभाग
आत्मा (ATMA) कार्यालय
पंचायत समिती
CSC केंद्र
6. ऑनलाइन नोंदणी
आजकाल अनेक योजना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा लागतो.
उदाहरणार्थ - महा-डीबीटी पोर्टल वर शेतकरी गट नोंदणी करून योजनांसाठी अर्ज करता येतो.
गटाची माहिती, अध्यक्ष व सचिव यांची माहिती आणि अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी नोंदवून अर्ज सादर करावा लागतो.
शेतकरी गट नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकरी गट नोंदणी करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात.
गट स्थापन ठराव
सर्व सदस्यांची यादी
सर्व सदस्यांचेआधार कार्ड
सर्वांचा 7/12 उतारा,8-अ उतारा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
गटाचा अर्ज फॉर्म
जमीन नकाशा (गरज भासल्यास)
काही योजनांसाठी गटाची सदस्य यादी, क्षेत्र नकाशा, बँक तपशील आणि प्रकल्प अहवाल देखील आवश्यक आहे.
शेतकरी गटासाठी शासकीय योजना
शेतकरी गटांना शासनाकडून अनेक योजना उपलब्ध आहेत.
1. गट शेती योजना
या योजनेअंतर्गत शेतकरी एकत्रित शेती करून उत्पादन वाढवू शकतात.
2. पिक प्रात्यक्षिक योजना
नवीन पिके आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी मदत दिली जाते.
3. कृषी यांत्रिकीकरण योजना
ट्रॅक्टर, अवजारे, उपकरणे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
4. शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)
शेतकरी गट मोठा झाल्यास FPO स्थापन करता येते.
5. प्रक्रिया उद्योग योजना
कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून जास्त नफा मिळवता येतो.
शेतकरी गटाचे व्यवस्थापन कसे करावे
शेतकरी गट यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.
गटाची नियमित बैठक घेणे.
सर्व निर्णय एकत्रितपणे घेणे.
आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणे.
प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेणे.
उत्पादनाचे योग्य नियोजन करणे.
शेतकरी गटातून माध्यमातून व्यवसायाच्या संधी
शेतकरी गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय सुरू करता येतात.
भाजीपाला उत्पादन
फळबाग
दुग्ध व्यवसाय
कुक्कुटपालन
शेळीपालन
मधमाशी पालन, इत्यादी
यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळते.
शेतकरी गट यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या सूचना.
शेतकरी गट यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
सदस्यांमध्ये विश्वास असणे.
योग्य नियोजन करणे.
बाजारपेठेचा अभ्यास करणे.
तंत्रज्ञानाचा वापर करणे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेणे.
शेतकरी गट ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. एकत्रित शेती केल्यामुळे खर्च कमी होतो, उत्पादन वाढते आणि बाजारपेठेत चांगला दर मिळतो.
शासनाकडूनही शेतकरी गटांना विविध योजना, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी गट स्थापन करणे ही काळाची गरज आहे.(एकीचे बळ ही गोष्ट तर आपणा सर्वांना माहीतच असेल).
Tags
सरकारी योजना
