शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे
, नाशिक, अहमदनगर,(अहिल्यानगर) सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) अशा अनेक जिल्ह्यात वांग्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
, नाशिक, अहमदनगर,(अहिल्यानगर) सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) अशा अनेक जिल्ह्यात वांग्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
ग्रामीण भागा सोबतच शहरांमध्येही वांग्याला मोठी मागणी असते.
आधुनिक पद्धतीने वांग्याची लागवड
योग्य पद्धतीने लागवड केल्यास वांग्यापासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून वांग्याचे उत्पादन वाढवता येते तसेच खर्च कमी करता येतो.
वांग्याच्या योग्य वाणांची निवड, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि योग्य कीड-रोग नियंत्रण या गोष्टी केल्यास वांग्यापासून भरघोस उत्पादन मिळते.
कमी खर्चात जास्त उत्पादन
वांग्याचे आहारातील महत्त्व
वांगी हे पौष्टिक भाजीपाला पीक आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. बाजारात वर्षभर वांग्याला मागणी असल्यामुळे हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.
वांग्याची लागवडीसाठी योग्य हवामान
वांग्याच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व समशीतोष्ण हवामान आवश्यक असते.
तापमान
20°C ते 30°C तापमान वांग्याच्या वाढीसाठी उत्तम असते.
पावसाचे प्रमाण
मध्यम पाऊस असलेल्या भागात वांग्याची लागवड चांगली होते.
सुपीक व कसदार जमिनीची निवड
वांग्याची लागवड हलकी ते मध्यम काळी जमीन, गाळाची जमीन किंवा उत्तम निचऱ्याची जमीन यामध्ये चांगली होते.
जमिनीचा pH
5.5 ते 7.5 दरम्यान असणे योग्य आहे.
लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
वांग्याच्या सुधारित जाती
जास्त उत्पादन मिळण्यासाठी सुधारित वाणांची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे.
अर्का नवनीत
पूसा पर्पल
भाजीपाला वांगी (हायब्रिड)
महिको वांगी
या जातींमध्ये उत्पादन जास्त मिळते तसेच रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते.
रोपवाटिका तयार करण्याची पद्धत
वांग्याची लागवड रोपांद्वारे केली जाते.
रोपवाटिका तयार करण्यासाठी
उंच वाफे तयार करावेत
कुजलेले शेणखत मिसळावे
बियाणे हलक्या मातीने झाकावे
हलके पाणी द्यावे
साधारणपणे 25 ते 30 दिवसांत रोपे लागवडीस तयार होतील.
लागवड करण्याची योग्य पद्धत
रोपे लागवडी योग्य तयार झाल्यानंतर व्यवस्थित उपटून घेणे. उपटताना रोपांची मुळे तुटणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.
दोन ओळीतील अंतर – 60 सेमी
दोन झाडातील अंतर – 45 सेमी
लागवड करताना सायंकाळी लागवड केल्यास रोपे लवकर रोपतात.
खत व्यवस्थापन
जास्त उत्पादनासाठी संतुलित खत देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रति एकर
शेणखत – 8 ते 10 टन. (लागवडीपूर्वी)
नत्र – 50 किलो
स्फुरद – 25 किलो
पालाश – 25 किलो. (लागवडीनंतर चार ते पाच दिवसांनी)
ठिबक सिंचनासोबत द्रवरूप खत (Water Solebal) दिल्यास उत्पादन वाढण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
पाणी व्यवस्थापन
वांग्याला नियमित पाणी देणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात
3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे
हिवाळ्यात
7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे
ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते.
तण नियंत्रण
तणांमुळे पिकाची वाढ कमी होते. त्यामुळे नियमित तण काढणे आवश्यक आहे.
दोन ते तीन वेळा खुरपणी करावी
वांगी पिकाला प्लास्टिक मल्चिंगपेपर वापरल्यास तनाचा प्रादुर्भाव कमी होतो.
वांग्यावर येणाऱ्या कीड व रोगांचे नियंत्रण
फळ छेदक अळी
मावा
तुडतुडे
नियंत्रण
फेरोमोन ट्रॅप वापरावे
योग्य कीटकनाशक फवारणी करावी
रोगट फळे काढून वांग्याच्या प्लॉट बाहेर त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
उत्पादन व काढणी
लागवडीनंतर साधारणपणे 60 ते 70 दिवसांनी वांग्याची तोडणी सुरू होते.
एक एकरातून साधारण
100 ते 150 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी उपाय
सुधारित वाणाची लागवड करावी.
ठिबक सिंचन वापर करावा.
सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.
मल्चिंग पद्धती वापरावी.
योग्य वेळी कीड नियंत्रण करावे.
या पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन वाढते तसेच खर्च देखील कमी होतो.
Tags
भाजीपाला
