नमस्कार शेतकरी बंधूंनो ,
आपल्या महाराष्ट्राच्या मातीत शेती हा केवळ व्यवसाय नसून तो आपल्या जगण्याचा आधार आहे. पण गेल्या काही वर्षांत निसर्गाचा लहरीपणा, कधी अवेळी पाऊस तर कधी दुष्काळ, यामुळे आपला बळीराजा कर्जाच्या विळख्यात अडकला आहे.
अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' सुरू केली आहे. ही योजना म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एक मोठा मदतीचा हात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना
ही योजना एक विशेष सरकारी योजना आहे ज्यांतर्गत ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे ते परत करू शकले नाही. अशावेळी आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी जेव्हा कर्जबाजारी होतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्याच्या कुटुंबावरच नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो.
जुन्या कर्जमाफी योजनांचे अनुभव लक्षात घेऊन, अधिक पारदर्शक आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ देणारी यंत्रणा उभी करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.
अहिल्यादेवींच्या कार्यक्षम प्रशासनाचा वारसा सांगत, ही योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीयोजनेची उद्दिष्टे
१. थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे.
२. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आणि त्यांना मानसिक आधार देणे.
३. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बँकिंग प्रणालीशी जोडणे, जेणेकरून त्यांना पुढील पिकासाठी नवीन कर्ज मिळू शकेल.
४. ग्रामीण भागातील शेती उत्पादकता वाढवणे.
३. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बँकिंग प्रणालीशी जोडणे, जेणेकरून त्यांना पुढील पिकासाठी नवीन कर्ज मिळू शकेल.
४. ग्रामीण भागातील शेती उत्पादकता वाढवणे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
० थेट लाभ:कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केली जाते.
- पारदर्शकता: आधार प्रमाणीकरणाद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते, ज्यामुळे भ्रष्टाचार किंवा चुकीच्या व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता कमी होते.
- कर्जमाफीची मर्यादा (रक्कम)
- या योजनेअंतर्गत साधारणपणे २ लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाची माफी दिली जाते. जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्याला २ लाखांवरील रक्कम स्वतः भरावी लागते, त्यानंतरच २ लाखांची माफी लागू होते.
- पात्रता निकष
- १. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- २. त्याचे नाव शेतकरी म्हणून सातबारा उताऱ्यावर असावे.
- ३. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकबाकीमध्ये गेले आहे, तेच याला पात्र आहे.
- ४. सरकारी नोकरीत असणारे (चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून), आमदार, खासदार किंवा आयकर भरणारे व्यक्ती या योजनेस पात्र नसतील.
- आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक केलेले).
- सातबारा आणि ८-अ चा उतारा.
- बँक पासबुकची प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- कर्ज घेतल्याचा पुरावा (बँकेचे प्रमाणपत्र).
- लाभार्थी निवड प्रक्रिया
- बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी सरकारला सादर केली जाते.
- त्यानंतर या यादी ची पडताळणी करून आणि आधार प्रमाणीकरण करून पात्र लाभार्थ्यांची 'गाव पातळीवर' यादी प्रसिद्ध केली जाते. ज्यांच्या नावावर आक्षेप नाही, त्यांना थेट लाभ दिला जातो.
- अर्ज करण्याची पद्धत
- ही प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी करण्यात आली आहे:
- १. शेतकऱ्याने जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' (CSC) वर जावे.
- २. तिथे आपला आधार क्रमांक देऊन बायोमेट्रिक (अंगठा) प्रमाणीकरण करावे.
- ३. आपल्या कर्ज खात्याची माहिती तपासावी आणि अर्ज सबमिट करावा.
- कर्जमाफी योजनेचे फायदे
- या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकरी 'CIBIL' च्या कचाट्यातून बाहेर पडतो. एकदा का जुने कर्ज माफ झाले की, शेतकऱ्याचा सातबारा कोरा होतो आणि तो पुढील हंगामासाठी नवीन कर्ज घेण्यास पात्र होतो. यामुळे खाजगी सावकारांकडून होणारी पिळवणूक बंद होते.
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन
- केवळ थकबाकीदारांनाच नव्हे, तर जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज भरतात, त्यांच्यासाठीही सरकारने 'प्रोत्साहनपर लाभ योजना' आणली आहे.
- अशा शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान देऊन त्यांचा सन्मान केला जातो, जेणेकरून भविष्यात कर्ज भरण्याची शिस्त कायम राहील.
- योजनेअंतर्गत समाविष्ट बँका
- सर्व राष्ट्रीयीकृत बँका (उदा. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यासारख्या इतरही नॅशनलाईज बँकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे).
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCB).
- ग्रामीण बँका.
- योजनेचीअंमलबजावणी
- सहकार विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाते.
- बँकांकडून डेटा गोळा करणे, त्याचे ऑडिट करणे आणि त्यानंतर थेट 'PFMS' प्रणालीद्वारे पैसे हस्तांतरित करणे अशी ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडली जाते.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावयाची तयारी
- आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा.
- कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत सरकारी पोर्टलवर माहिती तपासा.
- यादीत नाव न आल्यास तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार नोंदवा.
- योजनेचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम
- जेव्हा शेतकरी कर्जमुक्त होतो, तेव्हा तो आत्मविश्वासाने शेतीत नवनवीन प्रयोग करू शकतो.
- यामुळे ग्रामीण भागात पैशांचा ओघ वाढतो आणि कृषी आधारित उद्योगांना चालना मिळते.
- ही योजना केवळ आर्थिक मदत नसून ती शेती क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचा एक मार्ग आहे. एकंदरीत या योजनेचा बारकाईने विचार केला तर
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही आपल्या कष्टकरी बांधवांसाठी एक "नव संजीवनी' आहे.
- सरकारने दिलेल्या या संधीचा आपण नक्कीच उपयोग करून आपण आपल्या शेतीला पुन्हा सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.
- कर्जमुक्त होऊन प्रगत शेतीकडे वाटचाल करणे, हेच या योजनेचे खरे यश असेल.
- शेवटी एवढेच मला असं वाटतं.. कर्जमाफीतून उज्वल भविष्याकडे.
