![]() |
| महसूल अभियान 2026 अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध महसुली प्रश्नांचे निराकरण केले जाणार आहे. |
शेतकऱ्यांनाअनेक वेळा जमिनीचे कागदपत्र, फेरफार नोंदी, वारस नोंद , जातीचे दाखले , उत्पन्नाचे दाखले अशा विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागते. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात.
हीच समस्या लक्षात घेऊन शासनाने हे विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभियानामुळे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे शेतकरी व सामान्य लोकांना त्यांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करून घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश
या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढणे आणि नागरिकांना शासनाच्या सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे.
शेतकऱ्यांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करणे.
शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित कागदपत्रे लवकर उपलब्ध करून देणे.
प्रलंबित फेरफार आणि वारस नोंदी पूर्ण करणे.
महसूल विभाग आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवणे.
जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, असे प्रमाणपत्र गाव पातळीवर उपलब्ध करून देणे.
अभियानाची अंमलबजावणी कशी होणार?
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावपातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकतील आणि शक्य तितक्या लवकर त्यावर निर्णय घेतील.
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांसारखे अधिकारी गावपातळीवर भेट देऊन प्रलंबित प्रकरणांची तपासणी करतील.
त्यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
या अभियानात मिळणाऱ्या प्रमुख सेवा
1. 7/12 आणि 8A उतारा दुरुस्ती
शेतजमिनीचे महत्त्वाचे कागदपत्र असलेल्या 7/12 आणि 8A उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
2. फेरफार नोंदी मंजुरी
जमीन खरेदी-विक्री, वारसा किंवा इतर कारणांमुळे कराव्या लागणाऱ्या फेरफार नोंदींची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाईल.
3. वारस नोंद (Heirship Entry)
जमिनीचा मालक मृत झाल्यानंतर वारसांच्या नावावर जमीन नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल.
4. जमीन मोजणीसंबंधित तक्रारी
जमिनीच्या सीमारेषा किंवा मोजणीबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण केले जाईल.
5. विविध प्रमाणपत्रे
जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या सेवाही उपलब्ध करून दिल्या जातील.
राजस्व अभियानाचे शेतकऱ्यांसाठी होणारे फायदे.
महसूल कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल.
जमिनीची कागदपत्रे लवकर मिळतील.
फेरफार आणि वारस नोंदी जलदगतीने पूर्ण होतील.
शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
शेतकऱ्यांच्याव वेळेची आणि पैशाची बचत होईल.
अभियानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
शेतकऱ्याचे आधार कार्ड,
फार्मर आयडी,
7/12 उतारा किंवा 8A उतारा.
वारस नोंदीसाठी संबंधित दस्ताचे पुरावे.
अर्ज करण्यासाठी फॉर्म
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2026 हा उपक्रम महसूल विभागाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे.
शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपक्रम आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेले हे अभियान शासनाची लोकाभिमुख भूमिका दर्शवते. त्यामुळे सर्व शेतकरी व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपले प्रलंबित महसूल कामे पूर्ण होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळत आहे.
