(Tomato farming)टोमॅटो शेतीत यशस्वी कसे व्हाल? टोमॅटो पिकाविषयी संपूर्ण माहिती.


शेतकरी बंधूंनो,टोमॅटो हे पीक आपल्या भारतातील सर्वात महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. जवळपास प्रत्येक स्वयंपाकात टोमॅटोचा वापर होत असल्यामुळे बाजारात त्याची नेहमीच मागणी असते.
 आपण जर योग्य नियोजन, सुधारित वाण, खत व्यवस्थापन आणि रोग-किड नियंत्रण केल्यास टोमॅटो शेतीतून आपल्याला चांगले उत्पादन व नफा मिळू शकतो. 
आधुनिक पद्धतीने टोमॅटोची लागवड केल्यास कमी खर्चात जास्त उ

त्पादन घेता येते.

यशस्वी टोमॅटोचे उत्पादन घेणारे महाराष्ट्रातील जिल्हे. 


नाशिक,पुणे,अहमदनगर(अहिल्यानगर),सातारा,सोलापूर
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर),जळगाव,लातूर
नागपूर इत्यादी जिल्ह्यामध्ये टमाट्याची उत्पादन मोठ्या प्रमाणावर आणि दर्जेदार घेतले जाते.

      टोमॅटो लागवडीसाठी योग्य हवामान


टोमॅटो हे उष्ण व समशीतोष्ण हवामानात चांगले वाढणारे पीक आहे.
20°C ते 30°C तापमान टोमॅटो वाढीसाठी उत्तम असते.
जास्त थंडी किंवा जास्त उष्णता असल्यास फुलगळ होण्याचे प्रमाण वाढते.

टोमॅटो लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड .


मध्यम ते भारी काळी जमीन
सेंद्रिय द्रव्ये भरपूर असलेली जमीन
जमिनीचा pH 6 ते 7.5 दरम्यान असावा.
पावसाळ्यात पाण्याचा निचरा चांगला होईल अशा जमिनीची निवड करावी.

टोमॅटोचे सुधारित वाण


टोमॅटोचे उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाण निवडणे खूप गरजेचे आहे .
आपल्याकडील काही लोकप्रिय वाण:
अर्का विकास
पुसा रुबी
अभिलाष
नामधारी
साकाटा
योग्य हायब्रिड टोमॅटो वाण निवडल्यास त्याची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते आणि उत्पादनही अधिक मिळते.

रोप तयार करण्याची पद्धत


टोमॅटोची लागवड प्रामुख्याने रोपांद्वारे केली जाते.
चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे.
रोपवाटिकेसाठी उंच वाफे तयार करावेत.
वाफ्यावर शेणखत व जैवखते टाकावीत.
बियाणे टाकल्यानंतर हलके पाणी द्यावे.
साधारण 25 ते 30 दिवसांनी रोपे लागवडीसाठी तयार होतात.

आधुनिक लागवड पद्धत


रोपे तयार झाल्यावर व्यवस्थित उपटून त्याची मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी .
टोमॅटोची लागवड वाफ्यामध्ये किंवा सरीमध्ये करावी. दोन रोपांमधील अंतर : 45 ते 60 सेमी असावे. 
दोन ओळीतील अंतर : 60 ते 90 सेमी असाव.
संध्याकाळच्या वेळी लागवड करणे फायदेशीर असते.


टोमॅटो पिकाचे खत व्यवस्थापन


टोमॅटो पिकाला संतुलित खत देणे अतिशय आवश्यक आहे.
लागवडीपूर्वी 15 ते 20 टन शेणखत प्रति हेक्टर घालावे.
 लागवडीनंतर रासायनिक खत द्यावे.
नत्र (N)
स्फुरद (P)
पालाश (K)
खते टप्प्याटप्प्याने दिल्यास उत्पादन वाढते.

   टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन

टोमॅटो पिकासाठी नियमित पाणी देणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांनी पाणी व
हिवाळ्यात 7 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे
ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची बचत होते

टोमॅटो पिकावरील किड व रोग व्यवस्थापन.


टोमॅटो पिकावर आढळणाऱ्या प्रमुख किडी.
फळ पोखरणारी अळी
मावा
पांढरी माशी
प्रमुख रोग
करपा रोग
पान वाळणे
मुळकुज

   रोगावरील नियंत्रणासाठी उपाय.


लागवड करताना रोगप्रतिकारक वाण वापरावेत.
वेळेवर फवारणी करावी
खुरपणी करून शेत नेहमी स्वच्छ ठेवावे.

  उत्पादन आणि तोडणी.

टोमॅटो लागवडीनंतर साधारण 70 ते 90 दिवसांत 
तोडणी सुरू होते.
पिकलेली फळे लाल रंगाची होतात.
वेळेवर काढणी केल्यास बाजारात चांगला दर मिळतो.
योग्य व्यवस्थापन केल्यास एक हेक्टरमध्ये अंदाजे 
400 ते 600 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
टोमॅटो शेतीत यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी.
नेहमी सुधारित बियाणे वापरा.(Certified seeds)
ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर करा
वरचेवर प्लॉटचे निरीक्षण करून वेळेवर किड-रोग नियंत्रण करा.
बाजार भावाचा अंदाज लक्षात घेऊन लागवड करावी. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर,
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव  हे शहर टोमॅटो एक्स्पोर्ट मार्केट साठी खूप प्रसिद्ध आहे.
शेतकरी बंधूंना आपण जर एकंदरीत विचार केला तर
टोमॅटो हे कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे भाजीपाला पीक आहे. 
योग्य हवामान, सुधारित वाण, संतुलित खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण केल्यास टोमॅटो शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणे शक्य आहे.
आधुनिक पद्धतीच्या शेती तंत्रज्ञानाचा वापर करून टोमॅटो लागवड केल्यास उत्पादन वाढते आणि शेती अधिक फायदेशीर ठरते.



Post a Comment

Previous Post Next Post
WhatsApp कृषी मित्र ग्रुप