शेतकरी बंधूनो,शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी मातीची योग्य माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा शेतकरी अंदाजाने खतांचा वापर करतात, त्यामुळे खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होते.
यासाठी माती परीक्षण (Soil Testing) हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची अचूक माहिती मिळते आणि योग्य खत व्यवस्थापन करण्यासमदत होते .
माती परीक्षण म्हणजे काय?
मातीतील पोषक तत्वे (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सूक्ष्म अन्नद्रव्ये) आणि pH स्तर तपासण्याची प्रक्रिया म्हणजे माती परीक्षण होय.
माती परीक्षणाचे महत्त्व.
जमिनीची सुपीकता समजते.
योग्य खतांची निवड करता येते.
उत्पादन वाढते.
खर्च कमी होतो.
जमिनीचे आरोग्य सुधारते.
माती परीक्षण केव्हा करावे?
शेतात पीक लागवडीपूर्वी,
दर 2 ते 3 वर्षांनी एकदा,
खतांचा वापर करण्याआधी,
नवीन पिक घेण्याआधी माती परीक्षण करणे गरजेचे असते.
मातीचा नमुना कसा घ्यावा?
माती परीक्षणासाठी योग्य नमुना घेणे खूप महत्त्वाचे आहे:
👉 शेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून नमुना घ्या
👉 वरची 1-2 इंच माती काढून टाका
👉 6-9 इंच खोलीपर्यंत माती घ्या
👉 8-10 ठिकाणांहून माती गोळा करा
👉 सर्व माती एकत्र करून चांगली मिसळा
👉 सुमारे 500 ग्रॅम नमुना घ्या
माती परीक्षणासाठी आवश्यक साहित्य.
फावडे किंवा खुरपे
स्वच्छ बादली
प्लास्टिक पिशवी
मार्कर/लेबल इत्यादी साहित्याची गरज भासते.
नमुना गोळा करताना घ्यावयाची काळजी
रासायनिक खत टाकल्यानंतर लगेच नमुना घेऊ नका
पाणथळ किंवा ओलसर माती घेणे टाळा.
झाडांच्या मुळाजवळून नमुना घेऊ नका.
स्वच्छ साधनांचा वापर करा.
माती परीक्षण कुठे करावे?
कृषी विभाग प्रयोगशाळा
कृषी विज्ञान केंद्र (KVK)
खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळा
माती परीक्षण अहवाल कसा वाचावा?
अहवालात खालील बाबी नमूद केलेल्या असतात:
pH स्तर (अम्ल/क्षारता)
नायट्रोजन (N)
फॉस्फरस (P)
पोटॅशियम (K)
सूक्ष्म अन्नद्रव्ये, या घटकांचं आपल्या जमिनीत असणार प्रमाण दिलेले असते.
👉 अहवालानुसार खतांचे प्रमाण ठरवावे
माती परीक्षणाचे फायदे
✅ उत्पादनात वाढ
✅ खतांचा योग्य वापर
✅ खर्चात बचत
✅ जमिनीची गुणवत्ता सुधारते.
✅ दीर्घकालीन शेती टिकाऊ बनते.
शेतकरी बंधूंना एकंदरीत विचार केला तर ..
माती परीक्षण हे आधुनिक शेतीचे मूलभूत पाऊल आहे. योग्य पद्धतीने माती परीक्षण केल्यास शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतो.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने नियमित माती परीक्षण करूनच शेती करावी.
Tags
खत व्यवस्थापन
