ढगाळ वातावरण आणि हवेतील वाढलेली आर्द्रता (७०-८०%) कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे आपल्याला दिसून येतो. अशा वातावरणात प्रामुख्याने करपा, डाऊनी मिल्ड्यू आणि फुलकिडे या समस्या पहावयास मिळतात.
१. करपा रोग (Purple Blotch / Stemphylium Blight)
हा रोग प्रामुख्याने Alternaria porri या बुरशीमुळे होतो. ढगाळ हवामानात याची तीव्रता ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
- लक्षणे: पानांवर सुरुवातीला पांढरकट लंबोळे ठिपके पडतात, ज्यांचा मधला भाग जांभळट किंवा तपकिरी होतो. कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळतात आणि पाने शेंड्याकडून वाळू लागतात.
- नियंत्रण:
- रासायनिक: मॅन्कोझेब (०.२%), प्रोपीकोनॅझोल किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन + डायफेनकोनॅझोल (१ मिली प्रति लिटर) यांची फवारणी करावी.
- जैविक: ट्रायकोडर्मा (२ किलो प्रति एकर) २०० लिटर पाण्यातून आळवणी (Drenching) करावी.
२. डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew / केवडा)
हा रोग 'पेरोनोस्पोरा डिस्ट्रक्टर' बुरशीमुळे होतो. थंड आणि अतिदमट हवामानात याचा प्रसार वेगाने होतो.
- लक्षणे: पानांवर फिक्कट हिरवे किंवा पिवळसर चट्टे दिसतात, ज्यांच्या खाली पांढऱ्या किंवा राखेडी रंगाची बुरशी वाढते. यामुळे कांदा नीट पोसला जात नाही आणि लवकर मोड येतो.
- नियंत्रण: मेटॅलॅक्सिल ८% + मॅन्कोझेब ६४% (३५०-४०० ग्रॅम प्रति एकर) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (५०% WP) ची फवारणी प्रभावी ठरते.
३. फुलकिडे (Thrips)
ढगाळ हवामान आणि वाढलेले तापमान फुलकिड्यांच्या वाढीसाठी पोषक असते.
- लक्षणे: हे कीटक पानांतील रस शोषतात, ज्यामुळे पानांवर चांदीसारखे पांढरकट चट्टे दिसतात. प्रादुर्भाव वाढल्यास पाने वाकडी होऊन वाळतात.
- नियंत्रण: फिप्रोनिल (१५ मिली प्रति १० लिटर) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (०.७५ ते १ मिली प्रति लिटर) चा वापर करावा. फवारणीत नेहमी चांगल्या गुणवत्तेचे स्टीकर वापरावे जेणेकरून औषध पानांवर टिकून राहील.
- किंवा मग
- पहिली फवारणी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझिम (२५ ग्रॅम) आणि फिप्रोनिल (१५ मिली) करपा आणि फुलकिडे नियंत्रण
- दुसरी फवारणी प्रोपीकोनॅझोल (१० मिली) आणि कार्बोसल्फान (२० मिली) रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी
- बुरशीनाशक ट्रायडेमॉर्फ (०.१%) किंवा झिनेब (०.२%) बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी
४. एकात्मिक व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय
- पाण्याचा निचरा: शेतात पाणी साचू देऊ नका, यामुळे मुळकूज आणि मर रोगाचा धोका कमी होतो.
- खत व्यवस्थापन: नत्राचा (युरिया) अतिवापर टाळावा, कारण यामुळे पाने कोवळी राहून रोगांना बळी पडतात. सिलिकॉनची फवारणी केल्यास पिकात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
- पीक फेरपालट: एकाच जमिनीत सलग ३ वर्षे कांदा घेऊ नका.
- हवा खेळती ठेवणे: लागवड करताना दोन ओळींत योग्य अंतर ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील आणि आर्द्रता कमी होईल.
Tags
कीड & रोग व्यवस्थापन
